कुडाळ
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी प.पू.राऊळ महाराज मठ येथे रविवार दि. 29 जानेवारी ते गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी 2023 या कालावधीत प. पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज 38 वा यांचा पुण्यतिथी उत्सव महारुद्र स्वाहाकार अनुष्ठान सहित सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 29 रोजी पहाटे 5.30 वा. नित्य काकड आरती, सकाळी 8 ते 10 वा. समाधीस्थानी सार्वजनिक अभिषेक, दुपारी 12.30 वा. श्रींची आरती, दुपारी 1 ते रात्रौ 11 अखंड महाप्रसाद, दुपारी 3 वा. हळदी-कुंकू समारंभ,सायं. 4. ते रात्रौ 12 वा. पर्यंत जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा, नित्यक्रमानुसार 6.30 वा.सांजआरती सोमवार दि 30 जानेवारी रोजी पहाटे 5.30 वा. नित्य काकड आरती, सकाळी 8 ते 10 वा.समाधीस्थानी अभिषेक, सकाळी 10 वा. मोफत कृत्रिम जयपूर फूट मोजमाप शिबीर, स. 10.30 ते 11.30 वा.श्री प. पू. राऊळ महाराज भक्त मंडळ यांचे नामस्मरण, दुपारी 11.30 वा. श्री प. पू. अण्णा महाराज समाधी मंदिरात पादुकापूजन ,दुपारी 12.30 वा. श्रींची आरती दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद, सायं. 5 ते 6.30 वा. श्री. प. पू. स. स. राऊळ महाराज महिला भजन मंडळ यांचे भजन, सायंकाळी 6.30 सांजआरती, सायंकाळी 7 वा. चक्री कीर्तन कार्यक्रम, रात्री 10 वा. श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी यांचे भजन, मंगळवार 31 रोजी (मुख्य दिवस), पहाटे 5.30 वा. काकड आरती, सकाळी 6 वा श्री. प. पू. स. सद्गुरू राऊळ महाराज समाधी पूजन व सार्वजनिक गार्हाणे,महारुद्र स्वाहाकार अनुष्ठान शुभारंभ यजमान : राऊळ महाराज परिवार , सकाळी 7 ते दु. 1 मंगलाचरण प्रायश्चित विधी, महासंकल्प, गणेशपूजन, स्वस्तिवाचन, आचार्यवरण, प्राकारशुद्धी, कौतुकाभिमंत्रण, मंडप प्रतिष्ठा, अग्निस्थापना, मुख्यदेवता, नवग्रहस्थापना, ग्रहयज्ञ, वास्तूयाग, महारुद्रयाग प्रारंभ, लघुपूर्णाहुती, शांतीपाठ, सकाळी 9 वा. मोफत आरोग्य तपासणी शिबीर, स्थळ – दत्त मंदिर, सकाळी 11 वा. दिंडी, दु. 12.30 ते 1 वा.श्रींची महाआरती, दु. 1 ते 1.10 वा. पू. बाई माॅ यांच्या हस्ते सद्गुरू समर्थ राऊळबाबा’ विशेषांक प्रकाशन, दु. 1 ते रात्रौ 11 वा. अखंड महाप्रसाद, दुपारी 2 ते 5 वा. बाबू गडेकर यांचे दिंडी भजन , गोवा, सायंकाळी 5 ते 7 वा.’रघुकुल स्वरविहार’ सावंतवाडी प्रस्तुत भक्तीरंग, सायंकाळी 7.30,वा. श्रींची सांजआरती व पालखी मिरवणूक, रात्री 8 ते 10 वा.हरिपाठ, रात्रौ 11 वा.दशावतारी नाट्यप्रयोग, बुधवार 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 5.30 काकड आरती,सकाळी 6 वा. श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज समाधी पूजन व सार्वजनिक गार्हाणे, स. 7 ते दु. 1 वा. मंगलाचरण, आवाहित देवतापूजन, प्राकारशुद्धी, महारुद्रयाग, लघुपूर्णाहुती, शांतीपाठ, दु. 12.30 ते 1 वा. श्रींची महाआरती, दु. 1 ते रात्री 11 वा. महाप्रसाद, दु. 1 ते 3 वा. अनुभूती कथन, दुपारी 3 ते 5 वा. संगीत भजन, सायंकाळी 6 वा.सांजआरती, सायं. 7 ते 8.30 वा. कीर्तन, रात्री 9 वा. समईनृत्य, गुरुवार 2 फेब्रुवारी रोजी पहाटे 5.30 वा. काकड आरती, सकाळी 8.30 वा. श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिर येथे लघुरुद्र, स. 7 ते दु. 12 वा.मंगलाचरण, आवाहित देवतापूजन, प्राकारशुद्धी महारुद्रयाग, समाप्ती प्रकार क्षेत्रपालबलिदान पूर्णाहुती, अनीपूजा, अवभृथस्नान विभूतीवदन आचार्यपूजा, श्रेयोदान, दक्षिणा आशिर्वाद महामंगल आरती, मंत्रपुष्प, सामुहिक गान्हाणे, महाप्रसाद, अन्नसंतर्पण. दु. 12.30 ते 1 वा. श्रींची महाआरती, दु. 1 ते रात्रौ 11 वा. अखंड महाप्रसाद , दुपारी 1 वा.सुभाष आबा नलावडे, आजरा, प्रस्तुत श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज पंचक्रोशी भक्त मंडळ आजरा यांच्या दिंडीचे आगमन, दुपारी 3 ते 5 वा. अखंड नामस्मरण व भजन, सायं. 5 ते 7 वा. सांस्कृतिक कलाविष्कार, सायंकाळी 7 वा. श्रींची सांजआरती व पालखी मिरवणूक (प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिर ते दत्त मंदिर) रात्री 10 वा. श्री देवी सातेरी, पिंपळेवर महिला मंडळ दोडामार्ग यांची तीन अंकी पौराणिक संगीत नाट्यकलाकृती (अमृतमोहिनी), रात्री 3 वा.काकड आरती, श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज पुण्यतिथी उत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक कार्यक्रमांनी होत आहे. त्याचेच औचित्य साधून असा योग आल्यानिमित्त हा उत्सव सलग तीन दिवस महारुद्र स्वाहाकार अनुष्ठानाने साजरा करण्यात येणार आहे. भाविकांनी पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचा, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक कार्यक्रमांचा तसेच अखंड महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त विश्वस्त मंडळ , प.पू.राऊळ महाराज सेवा ट्रस्ट पिंगुळीचे कार्याध्यक्ष विठोबा राऊळ यांनी केले आहे.