मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमातील सुर;कोमसाप सावंतवाडी शाखेचे आयोजन
सावंतवाडी
मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन आम्हीच करणार आमची ही मातृभाषा आहे. प्रत्येकाने आपल्यापासूनच मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी आपण बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर कसा टाळता येईल हे जर कटाक्षाने पाळले तर निश्चितपणे मराठी भाषेचे संवर्धन आपोआप होईल असा संदेश आजच्या तरुणाईने देत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा फक्त पंधरावडा साजरा करण्यापुरता न राहता मराठी भाषा बोली मध्ये मराठीचाच उच्चार व्हायला हवा असा निर्धार कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केला.आणि अनोख्या पद्धतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रम ही साजरा केला.
कविता लेख कथा आणि मराठी भाषेच्या संदर्भातील इतिहास जागवत साहित्य उपक्रमात आजची तरुणाई मागे नाही हे या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले
यावेळी सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी 25 जानेवारीला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम जिल्हा खजिनदार तथा मराठी भाषा अध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष भरत गावडे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड संतोष सावंत उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर सहसचिव राजू तावडे सदस्य वाय पी नाईक प्राध्यापक रुपेश पाटील रामदास पारकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस प्रा पाटील आधी उपस्थित होते.