*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*
*जीवन*
गातोय रोजच्याला मी गीत जीवनाचे,
त्या ऊन पावसासम संगीत श्रावणाचे!
सुखदुःख मीच माझे कांडावयास राजी,
उखळात मुंडके तर सोशीन घाव त्याचे!
घालू नकोस मजला कसलीच भीक आता,
मज मोल देत जा तू गाळीन घाम त्याचे!
अडला कधीच नाही पैशामुळे खटारा,
उपकार मानतो मी साऱ्याच सोबत्याचे!
जाणे थकून काही तत्वात ते बसेना,
पुन्हा जरा नव्याने मज वेड धावण्याचे!
जयराम धोंगडे
नांदेड
(९४२२५ ५३३६९)