You are currently viewing पिंपरी चिंचवड पत्रकार काव्य मैफिल यशस्वी

पिंपरी चिंचवड पत्रकार काव्य मैफिल यशस्वी

पिंपरी : (प्रतिनिधी)

ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे नुकतेच पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया आयोजित पत्रकार काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले. प्रा. वाघमारे यांनी मकरंद अनासपुरे यांच्या हुबेहुब आवाजात कोरोना काळात डाॅक्टरांनी रुग्णांची कशी लुट केली यावर मिमिक्री करून सभागृहास हसविले. मुक्त पत्रकार ज्येष्ठ कवी बाबु डिसुजा यांनी आपल्या कवी ह्या कवितेने प्रथम सुरूवात केली.

काव्य मैफल दरम्यान परिषदेचे सचिव नाना कांबळे यांनी पर्यावरण विषयक तर पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी चालू राजकीय स्थितीवर विडंबन काव्य सादर केले. कवी अनंत राऊत यांनी आपल्या “मित्र वणव्यामधे गारव्यासारखा ” कवितेने रंग भरला.

माधुरी कोराड, घराला आकार देणारी मुलगीच, राजु वारभुवन, आई पीएच.डी झाली. जेष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के -माझी लेखणी, अमृता ओंबाळे- जगाचा नियम, अमोल काकडे- मैं सवाल हुं, दिपेश सुराणा-मैने जिंदगीसे, पितांबर लोहार-सरकार जाईल, सरकार येईल ,मारुती बानेवार -आम्ही पत्रकार, गोविंद वाकडे, भुषण नांदूरकर, संजय बेंडे, प्रशांत चव्हाण आदि पत्रकारांनी अति सुरस अशा कविता सादर केल्या.

डाॅ प्रकाश कोयाडे, राष्ट्रवादी काँग्रेस क्रिडा सेल अध्यक्ष समिता गोरे, देऊळबंद चित्रपटातील अभिनेत्री आर्या घारे, पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक अधिकारी बाळासाहेब ढसाळ, पत्रकार हल्ला कृती समितीचे अनिल भालेराव, शिवाजी घोडे, राम बनसोडे, राकेश पगारे, देवा भालके, आपला आवाज चे रोहीत खर्गे, सचिव प्रविण शिर्के, विश्वजित पाटील, श्रावणी कामत आदि पत्रकार उपस्थित होते.

दै. सामनाचे स्व. भालचंद्र मगदूम नावाने दिला जाणारा कविरत्न पुरस्कार आय बी एन लोकमत चॅनेल चे प्रतिनिधि गोविंद वाकडे यांना प्रदान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सकाळ चे मा.पितांबर लोहार यांनी तर अनिल वडघुले यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब ढसाळ यांनी आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =