You are currently viewing कनेडी मध्ये शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांत राडा

कनेडी मध्ये शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांत राडा

कणकवली

तालुक्यातील नेहमीच चर्चेत असलेल्या व आपल्या डॅशिंग कार्यपद्धतीमुळे प्रसिद्ध असलेल्या भाजपा पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये कनेडी येथे जोरदार राडा झाल्याचे समजते. त्या पदाधिकाऱ्याने एका कार्यकर्त्याला मारहाण केल्यावरून जाब विचारण्यासाठी या कार्यकर्त्याचे समर्थक त्या पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात घुसले. यावेळी एकमेकांना जोरदार धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते या कार्यालय परिसरात गोळा झाले आहेत. तसेच पोलिसांना माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार दाखल नसली तरीही परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.या राड्यामध्ये कुंभवडे येथील शिवसेनेचे सरपंच सूर्यकांत उर्फ आप्पा तावडे हे जखमी झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eight =