You are currently viewing राष्ट्रीय लोकअदालत ११ फेब्रुवारी रोजी – न्यायाधीश डी.बी. म्हालटकर

राष्ट्रीय लोकअदालत ११ फेब्रुवारी रोजी – न्यायाधीश डी.बी. म्हालटकर

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुकाजिल्हा व उच्च न्यायालयात शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२३  रोजी  राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डी.बी. म्हालटकर यांनी दिली.

                सन २०२३ या वर्षातील हे पहिले राष्ट्रीय लोकअदालत आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत सिंधुदुर्ग येथील जिल्हा व सत्र न्यायालय ओरोस या जिल्हा न्यायालयातील, दिवाणी न्यायालय व स्तर सिंधुदुर्ग न्यायालय व मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय सिंधुदुर्ग या न्यायालयातील प्रलंबित असलेली प्रकरणेजिल्हयातील सर्व तालुका न्यायालयांमधील प्रलंबीत असलेली प्रकरणे विनाविलंब निर्णय मिळविणेकामी व पक्षकारांनी शांततेने जीवन जगण्यासाठी त्यांचे संमतीने सामंजस्य करुन तडजोडीसाठी प्रकरणे ठेवण्यासाठी आवाहन करणेत येत आहे.

                जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अध्यक्ष एस. जे. भारुका व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डी.बी. म्हालटकर आवाहन करतात कीन्यायप्रविष्ट असलेली फौजदारी, दिवाणी,कौटुंबिक वाद,मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे यापैकी जे असेल ते प्रकरण दिनांक ११फेब्रुवारी  २०२३ रोजीचे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवावीत. आज पर्यंत एकूण जिल्ह्यातील न्यायालयामध्ये २ हजार ४९६ प्रलंबीत असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. तर १हजार ८६ वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. अजुनही ज्या लोकांमध्ये तडजोड होवू शकणारी अशी प्रकरणे आपल्याला तडजोडीसाठी ठेवावयाची असल्यास ज्या न्यायालयात प्रकरणे प्रलंबीत आहे त्या न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यासाठी अध्यक्ष न्या. एस. जे. भारुका यांनी केले आहे. यामुळे कायमस्वरुपी वाद मिटू शकेलजीवन सुखमय होवू शकेलक्षुल्लक वादाचे पर्यवसान काही वेळा कायम स्वरुपी वादात होते. वैराने वैर वाढतच रहाते. असे होवू नये यासाठी सामंजस्य घडवावे हाच आमचा लोकअदालतीचा हेतू आहे.

                समाजामध्ये शांतता व सलोखा रहावे हेच ध्येय आहे. लोकअदालतीचे पॅनेल सदस्य हे अनुभवी वकील असतात. तर पॅनेल प्रमुख हे न्यायाधीश असतात. ते आपली बाजू ऐकून घेवून योग्य समन्वय साधून उभयतांमध्ये तडजोड बाबत न्यायाचे तत्वास अधिन राहून सामंजस्य घडवतील. दोन्ही पक्षकारांची न्यायमागणी विचारात घेवून दोघां पक्षकारांच्या समत्तीने निवाडा दिला जातो. लोकअदालतीमध्ये केलेली तडजोड यामुळे केसचा झटपट निकाल लागतो. तोंडी पुरावा व उलटतपास टाळता येतो. एकमेकांविरुध्द असलेला गैरसमज दूर करता येतो.

                या निकाला विरुध्द अपिल होत नाही कारण हा निवाडा आपापसात झालेल्या समजुतीने होतो.तडजोड केल्याने एकमेकांत व्देष न वाढता सलोखा वाढतो. तडजोड हुकूमनाम्याप्रमाणेच अंतिम निवाडयाची अंमलबजावणी कोर्टामार्फत होते. त्यामुळे वेळ व पैसा वाचतो भरलेली कोर्ट फी परतावा रक्कम प्रकरण दाखल करणाऱ्यास परत मिळते. एक पाउल मागे जाणे हीच आपली मराठी बाण्याची ताकत आहे. आपलेसोबत आपले प्रकरणांमध्ये सहपक्षकार असल्यास त्यांनाही सोबत आणायला विसरु नका. “महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणमुंबई मार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे नियोजन केले आहे.

                बंधुनो, “सौख्यासाठी जीव धडपडेदेवाला ही नवस साकडेमनासारखे सर्व ना घडेतडजोडीने चला पुढेअहंमपनातून युध्द ठाकलेरावण कौरव राज्य संपलेस्वराज्य निर्माण करून तुम्हाला शिवरायांनी चातुर्याने राज्य रक्षीलेइतिहासाच्या अभ्यासातून शिकू यशाचे पाढेतडजोडीने चला पुढेकोर्ट-कचेऱ्याभांडण-तंटेधन चिंतेने आयुष्य घटेस्वार्थापाई स्नेह लुटेसंघर्षातून मनही विटेसमझोत्याने प्रश्न सुटेतडजोडीने चला पुढेजिवन साथी संसाराचामनासारखा मिळे न साचाभाव ठेविता अव्दैताचासुख दुखातही लाभ प्रीतीचाघुसफुसलो तरी सुटती तिडेतडजोडीने चला पुढे रंग रूप जरी देवी देणे. कधी वाटे उदास वाणेकुशल कलेन भाग्य साधणेसुंदर होई जीवनगाणेकरु नये मन कधी कुढे तडजोड़ी ने चला पुढेहेच आमचे तडजोडिचे तुम्हा साकडे.

प्रतिक्रिया व्यक्त करा