मालवण
वडाचापाट येथील स्वयंभू श्री शांतादुर्गा देवी जत्रोत्सव कालावधीत आयोजित भजन स्पर्धेत श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुक यांनी प्रथम क्रमांक पटकावला .
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक स्वर साधना संगीत भजन मंडळ वर्दे, तृतीय देवश्री संगीत भजन मंडळ मसुरे, यांनी तर उतेजनार्थ दत्त प्रासादिक भजन मंडळ वर्दे, भिवना देवी प्रासादिक भजन मंडळ नांदोस याना रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्पर्धेत उत्कृष्ट हार्मोनियम अक्षय परुळेकर ( वायरी), पखवाज प्रथमेश राणे ( वर्दे), झंज शंकर सावंत ( हरकुळ बुद्रुक) याना सुद्धा सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण संजय दळवी आणि शेख गुरुजी यांनी केले. यावेळी अध्यक्ष देवानंद पालव, सचिव मनोज पालव,उपाध्यक्ष निलेश मांजरेकर,जेष्ठ सल्लागार सुधाकर पालव, माजी सभापती राजू देसाई, दया देसाई, उपसरपंच सचिन पाताडे, सदस्य सविता पालव, भालचंद्र पालव ,विनोद बिरमोळे, धनंजय पालव ,अर्जुन (आप्पा) पालव, कृष्णा घनश्याम पालव,निखिल पालव, पालव, राकेश पालव, प्रीतम पाटकर, नरहरी पालव, महेश तावडे, विनायक पालव ,अजय पालव, भदु प्रभाकर पालव, विजय घाडीगांवकर, उत्तम घाडीगांवकर, प्रसाद तावडे, प्रसाद पाटकर, दिलीप पालव, उत्तम पालव, रुपेश पालव, विजय पालव, नारायण पालव, विठोबा पालव, सुरेंद्र पालव, शंकू पालव, ताराचंद पालव, सुनील पालव, मोहन पालव, सुरेंद्र पालव, भुपेश पालव, गौरव पालव, रुपेश पालव, संजय पालव, अनिकेत हडकर, श्री कासले, मालवणकर, फोंडगे, सत्यवान पालव, प्रमोद पाटकर, प्रभाकर पालव, राजू तावडे,प्रदीप पालव, दयानंद पालव, दत्ताराम पालव, विवेक पाटकर, भुपेंद्र पालव, प्रकाश पालव, अनिकेत वारंग, गणेश घाडीगांवकर, संतोष पालव आदी उपस्थित होते.