You are currently viewing निर्लोभी तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणजे प्रा. मधु दंडवते – प्रा.अरुण मर्गज

निर्लोभी तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणजे प्रा. मधु दंडवते – प्रा.अरुण मर्गज

कुडाळ :

निश्चयी, निर्लोभी, तत्त्वनिष्ठ सदाचारणी राजकारणी म्हणजे प्रा मधु दंडवते. सत्तेची कोणत्या प्रकारची हाव न बाळगतात समाजासाठी आणि राष्ट्रासाठी काम करत राहणं हा ज्यांचा स्वभाव धर्म होता .सत्यान्वेशी बुद्धी आणि सामाजिक तत्त्व मूल्यावर ज्यांची प्रगाढ श्रद्धा होती असे माजी रेल्वेमंत्री, माजी अर्थमंत्री असलेले प्रा मधु दंडवते यांच्या कार्याचे स्मारक कोकण रेल्वेच्या रूपाने अजरामर राहील, असे उद्गार अरुण मार्गज यांनी काढले. ते प्रा.मधु दंडवते यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आदरांजली अर्पण करताना ते बोलत होते.

त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये निर्मोही, नि: स्वार्थी राजकारणी त्याचबरोबर कोकण रेल्वेचे शिल्पकार व कोकणी जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेले मधु दंडवते यांच्या शुद्ध व तत्वनिष्ठ चारित्र्याचा उपस्थितांना परिचय करून दिला. सदर कार्यक्रम शिक्षण संस्था तर्फे कुडाळ रेल्वे स्टेशनच्या आवारात दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहात असताना ते बोलत होते.

प्रा मधु दंडवते यांचे मानसपुत्र म्हणून कार्यरत असलेले बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी कुडाळ, सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या आवारात व बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये असलेल्या मधु दंडवते यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीही कुडाळ रेल्वे स्टेशनच्या आवारात व सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या आवारात मधु दंडवते यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रा.मधु दंडवते यांच्या कार्याची ओळख सर्वसामान्यांना व्हावी यासाठी 2023 ते 2024 हे जन्मशताब्दी वर्ष विविध उपक्रमांद्वारे साजरे करण्यात येणार असल्याचेही उमेश गाळवणकर यांनी कथन केले आहे.

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथील कार्यक्रमात प्रा. मधु दंडवते यांना श्रद्धांजली अर्पण करताना स्टेशन मास्तर श्री शैलेंद्र कर्पे, मडुरा स्टेशन मास्तर कृष्णकांत परब, वेंगुर्लेचे माजी सभापती श्री सुनील मोरजकर, रंजना ओटवणेकर, शिवप्रसाद पेडणेकर, दत्ता मातोंडकर, वरळी हॉस्पिटलच्या स्टाफ नर्स हवाबी शेख, अंकिता पेडणेकर तसेच बी.एड कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, प्रा. योगिता शिरसाट, प्रसाद कानडे , वैष्णवी सावंत ,आकांक्षा सावंत ,सुविधा जाधव इत्यादी उपस्थित होते.

कुडाळ येथे प्रा.मधु दंडवते यांना श्रद्धांजली करताना अरुण मर्गज, यांच्यासोबत प्रा. अनुष्का रेवंडकर, सेंट्रल स्कूलच्या विभा वझे, सौ.अश्विनी परब, स्टेशन मास्तर प्रज्ञा नाईक, रेल्वे कर्मचारी भरत नाईक विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व प्रवासी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 4 =