राज्यस्तरीय व्यसनमुक्ती काव्यस्पर्धा, संमेलन परिसंवाद 22 जानेवारी रोजी
सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई व शाखा सिंधुदुर्गच्यावतीने राज्यस्तरीय व्यसनमुक्ती काव्यस्पर्धा, काव्य संमेलन, परिसंवाद रविवार दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता गोपुरी आश्रम, प्रशिक्षण केंद्र सभागृह (नाईक पेट्रोल पंपाच्या मागे) वागदे ता. कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती व्यसनमुक्ती सिंधुदुर्ग जिल्हा समिती यांच्याकडून देण्यात आली आहे.
या परिसंवादाला प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी शाम चव्हाण, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास, महाराष्ट्र राज्य मंडळाचे नशाबंदी राज्य संघटक अमोल माडामे, मानोविश्लेषक तज्ञ डॉ. रेश्मा भाईप, प्रसिध्दी अभिनेत्री प्राजक्ता वाडये, नशाबंदी मंडळाचे डिजिटल प्रचारक सुनील चव्हाण, यांची उपस्थित असणार आहेत.
व्यसनमुक्ती परिसंवाद सत्राचे अध्यक्षः अँड. ऋषीकेश पाटील (पत्रकार), डॉ. निहार हसबनीस (समुपदेशक विभागप्रमुख, मुक्तांगण, पुणे), विषय व्यसनाधीनतेवर उपाययोजना. अमोल कदम (कवी, माजिक कार्यकर्त) विषय राजकीय भूमिकेतून व्यसनमुक्ती, श्रेयश शिंदे (कवी, लेखक, पत्रकार विषय विषय व्यसनाधीनतेचे सामाजिक परिणाम, अंड. प्राजक्ता शिंदे (उपाध्यक्ष कणकवली तालुका वकील संघटना) विषय व्यसनमुक्तीसाठी कायद्याचा आधार.
व्यसनमुक्ती काव्य स्पर्धा ,कवी संमेलन अध्यक्ष : अमोल कदम कवी, सामाजिक कार्यकर्ते बक्षीस वितरण समारोप, व्यसनमुक्ती संकल्प, संयोजक : अर्पिता मुंबरकर सिधुदुर्ग जिल्हा संघटक आणि व्यसनमुक्त सिंधुदुर्ग जिल्हा समिती कणकवली महेश सरनाईक (पत्रकार) मेघा गांगण, स्मिता नलावडे, डॉ. प्रतिमा नाटेकर, हर्षदा बाळके, रीमा भोसले,वेंगुर्ला नंदन वेंगुर्लेकर, डॉ संजीव लिंगवत, वैभववाडी प्रा. सुरेश पाटील, अॅड. प्रताप सुतार,कुडाळ, दीपलक्ष्मी पडते. मालवण मनोजकुमार गिरकर, सावंतवाडी रुपेश पाटील,रवी जाधव, दोडामार्ग प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, प्रा. डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे, देवगड निळकंठ बगळे,व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी या उपक्रमात मोठ्या संखेने सहभागी व्हावे.