You are currently viewing ऐश्वर्य मांजरेकर यांची राज्यस्तरीय वातावरण बदल परिषदेसाठी निवड..

ऐश्वर्य मांजरेकर यांची राज्यस्तरीय वातावरण बदल परिषदेसाठी निवड..

मालवण

वातावरणातील बदल ही समस्या जागतिक समस्या म्हणून पुढे आली असल्यामुळे त्यावरील उपायही सर्वांनी मिळून करायला हवेत वातावरणातील बदलांमुळे सृष्टीतील काही जीव कायमस्वरूपी लुप्त होण्याची शक्यता वाढली आहे. उष्ण तसेच समशीतोष्ण कटिबंधातील विकसनशील तसेच अविकसित देशांमध्ये वातावरणातील बदलांचे प्रतिकूल परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागले आहेत, या बदलांसाठी स्वतःला तयारीत ठेवून विविध मार्ग शोधण्याची गरज आता निर्माण झाली.

या व अशा अनेक समस्यांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन कार्यक्रम अंतर्गत युनिसेफ महाराष्ट्र व पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्रातील निवडक ५० युवकांची राज्यस्तरीय वातावरण बदल परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये सहभागी युव महाराष्ट्रातील हवामान बदलावर काम करणाऱ्या समविचारी मित्र-मैत्रिणींशी संवाद साधण्याची, तसेच आपले वातावरण बदलाविरुद्धचे काम सर्वांसमोर सादर करण्याची संधी मिळेल.

ही परिषद वातावरण बदलाविरुद्धचे काम करण्यासाठी युवकांना एक मंच प्रदान करेल. या परिषदेमध्ये युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रख्यात स्पीकर असतील, सदर परिषद २१ ते २३ जानेवारी रोजी मुंबई सेंट्रल येथे पार पडणार आहे, या परिषदेसाठी राज्यभरातून युवकांनी अर्ज सादर केले होते. या मध्ये सिंधुदुर्ग मधील युथ बिट्स फॉर क्लायमेटस ग्रुप चे सदस्य ऐश्वर्य मांजरेकर यांचीही निवड करण्यात आली आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 17 =