श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिर तांबळडेग येथे अखंड हरिनाम सप्ताह वार्षिक सोहळ्याचे दि. २९जानेवारी ते दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजन
मुंबई –
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील तांबळडेग गावात प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह वार्षिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दि. २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. त्या पूर्वसंध्येला दि. २७ जानेवारी २०२३ रोजी मंदिर नववास्तुचा कळसारोहण सोहळा साजरा होईल. यावेळी हरिनाम सप्ताह काळातील यजमान मधुकर विठोबा धावडे व मनिषा मधुकर धावडे यांना नियुक्त करण्यात आले आहे. तर सप्ताहाला प्रारंभ झाल्यापासून सलग सात दिवस सांज महाआरती (शेजारती) व पहाटे काकड आरतीत गणपत भिवा सादये गायन करणार आहेत. यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमासोबत रोज रात्री ११ वाजता पौराणिक चित्ररथ आणि ऐतिहासिक कथा प्रसंगाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या मंगलमय धार्मिक सोहळ्याला सहकुटुंब सहपरिवार भक्तगण, भजनी मंडळीसह उपस्थित राहून या मंगलत्सवात सहभागी व्हावे असे अध्यक्ष मुधकर धावडे, चिटणीस काका मुगगेकर, मुंबई समिती प्रमुख गणपत सादये, मुंबई समिती सचिव अँड राज वसंत कुबल यांनी संयुक्तरीत्या आवाहन केले आहे.