कणकवली :
२१ जानेवारी पासून आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान आमदार नितेश राणे हे, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ बैठका, शिक्षक मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
२१ रोजी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट हायस्कूल येथे ९.३० वाजता आमदार नितेश राणे हे शिक्षक मतदारांच्या भेटी घेतील आणि बैठक होईल. त्यानंतर १० वाजता कणकवली तालुक्यातील करूळ हायस्कूलमध्ये शिक्षक मतदारांची बैठक होईल. १०.३० वाजता कणकवली कॉलेजमध्ये शिक्षक मतदार संघातील मतदारांची बैठक घेऊन चर्चा करतील. त्यानंतर ११ वाजता कणकवली पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता ओसगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारणी ला ते उपस्थित राहणार आहेत.
त्याच प्रमाणे मतदार संघातील विशेष कार्यक्रमांना ते प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. ग्रामस्थ,शेतकरी, शिक्षक,मच्छीमार,कार्यकर्ते, पदाधिकारी, यांच्या गाठीभेटी सुद्धा आमदार नितेश राणे घेणार आहे. यावेळी विकास कामांवर आणि जनतेच्या मागण्यांवर चर्चा, संघटनात्मक बैठका घेणार आहेत. मतदार संघात गाठीभेटी घेणार आहेत.