You are currently viewing दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर

*दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर*

*डॉ. विजया टिळक, अतुल जोशी, निवेदिता जोशी, मधुराणी प्रभुलकर आदी मानकरी*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

दरवर्षी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे संगीत, नाटक, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार प्रदान केले जातात. याही वर्षी हा सोहळा २८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता केंद्राच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

यावर्षी देण्यात येणारे हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार – श्री. कृ. जोशी (अच्युत जोशी), संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत – डॉ. विजया टिळक, उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक – अतुल पेठे, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री – निवेदिता जोशी-सराफ, उत्कृष्ट समीक्षक – राजीव जोशी, उत्कृष्ट आईच्या भूमिकेसाठी – मधुराणी प्रभुलकर, संगीत नाट्य क्षेत्रातील उत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेत्री – प्राची जठार, संगीत विशारद परिक्षेत दादर व माहीम विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त – अमृता गोगटे.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने दरवर्षी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. हे पुरस्कार कला व संगीत क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जातात. या कार्यक्रमास अधिकाधिक सदस्य तसेच रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =