You are currently viewing वृत्त—मंदाकिनी

वृत्त—मंदाकिनी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी लिखित अप्रतिम गझल*

*वृत्त—मंदाकिनी*

आभाळ होते दाटले तारेत आता गुंफले
कापूस काळे काजळी माळेत आता गुंफले

चाळून काही थेंबही पाण्यातल्या पाण्यातुनी
गाळून मोती वेचले धारेत आता गुंफले

पाऊस होतो झालरी या मेघडंबर अंबरी
बांधून दोरे सोडले रचनेत आता गुंफले

सौदामिनी ती लख्ख होई मेघनादे गर्जता अंधारवाटा मोडलेले बेत आता गुंफले

नात्यातली ही वीण जेव्हा सैलबंधे उचकता
टाचून धारा दाभणा समवेत आता गुंफले

—हेमंत कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + twenty =