You are currently viewing गाव तेथे मनसे शाखा अभियाना अंतर्गत संघटना वाढीसाठी प्रयत्न करा – मनसेचे राज्य सरचिटणीस संदिप दळवी यांचे आवाहन

गाव तेथे मनसे शाखा अभियाना अंतर्गत संघटना वाढीसाठी प्रयत्न करा – मनसेचे राज्य सरचिटणीस संदिप दळवी यांचे आवाहन

वेंगुर्ले:

गाव तेथे मनसे शाखा या अभियाना अंतर्गत पुढील काळात मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येवून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस संदिप दळवी यांनी केले. कोंडुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या सावंवाडी विधानसभा मतदासंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. प्रत्येक गावात मनसेच्या झेंड्याखाली काम करण्यासाठी तयार असलेला तरुण वर्ग निर्माण करा त्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाईल अशी ग्वाही देखील या वेळी व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांनी दिली.

यावेळी मनसे पक्षाच्या माध्यमातुन जे ग्रामंपचायत निवडणूकीत निवडून आलेले व पराभुत मनसे सदस्य सरपंचाचे करण्यात आला सत्कार त्यावेळी या मेळाव्याला मनसेचे कामगार सेना राज्य सरचिटणीस गजानन राणे, महिला राज्य उपाध्यक्ष अनिषा माजगावकर, राज्य उपाध्यक्ष योगेश सावंत, विद्यार्थीसेना संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, माजी जिल्हा अध्यक्ष धीरज परब. माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, महेश परब, सुधीर राऊळ, राजू कासकर, आशिष सुभेदार. अमित नाईक. सुनिल गवस, सनी बागकर, गुरुदास गवंडे, काशिराम गावडे, अतुल केसरकर, राकेश परब, अजित पोळजी, अक्षय पार्सेकर, आदेश सावंत, मिलिंद सावंत, मंदार नाईक, साईल तळकटकर, संदिप राऊळ, सचिन पांगम, केतन सावंत व अन्य पदाधिकरी कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी अनेक तरुणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला आणि हाॅलचा परीसर मनसेच्या घोषणानी दुमदुमुन टाकला. या सर्वांचे स्वागत संदिप दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − seven =