You are currently viewing चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे यश

चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे यश

मालवण

चित्रकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे. प्रशालेतर्फे परीक्षेमध्ये सहभागी झालेले सर्व १४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. त्यामध्ये ८ विद्यार्थी अ श्रेणी व ६ विद्यार्थी ब श्रेणी संपादित करीत उत्तीर्ण झाले.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशालेच्या कलाशिक्षिका सौ.आदिती ठाकूर व सौ. स्मिता वायंगणकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − two =