You are currently viewing नोंदणीकृत धान खरेदी केंद्रावर जावून शेतकऱ्यांनी धान विक्री करावी

नोंदणीकृत धान खरेदी केंद्रावर जावून शेतकऱ्यांनी धान विक्री करावी

– जिल्हा मार्केटींग अधिकारी अनिल देसाई

सिंधुदुर्गनगरी

खरीप हंगाम २०२२-२३ मधील शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान विक्रीसाठी आनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी दिनांक ३१ जानेवारी  अखेर ज्या धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेली आहे. त्या धान खरेदी केंद्रावर जावून धान (भात) विक्री करावयाची आहे. अशी  माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी अनिल देसाई यांनी  दिली आहे.

खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंअंतर्गत जिल्ह्यातील ३९ धान खरेदी केंद्रावरती धान खरेदी सुरु आहे. त्यांचा तालुकानिहाय तपशिल पुढीलप्रमाणे आहे. सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघामार्फत– कोलगाव, सावंतवाडी, मळगाव, मळेवाड,डेगवे, तळवडे, भेडशी,इन्सुली मडुरा. कुडाळ तालुका खरेदी-विक्री संघामार्फत- कुडाळपिंगुळीमाणगाव, कडावलआंब्रडघोडगेगोठोसकसालवेताळ बांबार्डे, पणदुरतुळसनिरुखेनिवजेफोंडा. मालवण तालुका खरेदी-विक्री संघामार्फत– पेंडूर, गोठणे. वेंगुर्ला तालुका खरेदी- विक्री संघामार्फत- वेंगुर्ला, होडावडा. देवगड तालुका खरेदी-विक्री संघामार्फत- देवगड, पडेल, पाटगाव. वैभववाडी तालुका खरेदी- विक्री संघामार्फत- वैभववाडी, करुळ. कणकवली तालुका खरेदी -विक्री संघामार्फत– कणकवली लोरे नं-१घोणसरीसांगवे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघ लि. मार्फत- ओरोस, कट्टा, मसुरे इत्यादी केंद्रावर धान खरेदी सुरु असून शासनाने पणन हंगाम २०२२-२३ करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करिता शासनाकडून प्रति क्विंटल दर रु. २०४० जाहिर करण्यात आलेला आहे. शासनाकडून खरदी दिनांक ३१ जानेवारी २०२३ अखेर पुर्ण करण्याची सुचना आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + thirteen =