You are currently viewing ईश्वराचं रूप ! गुलाब!

ईश्वराचं रूप ! गुलाब!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*ईश्वराचं रूप ! गुलाब!!*

मुखकमल पुष्पासवे सुगंधीत
तांबूल रक्तवर्णी कांता तुझी
अलक्तकाने रंगवून प्रमुदित
जन्मभराची संगत तुझी ..!

तुझ्या येण्यानं!लकेर आसमंती उठली
सुरांची बरसात चौफेर होवू लागली
तुझ्या दर्शना!देवही वाकून बघू लागले
गाभारा मोकळा!तुझी आरती गायली.!

कुणीही भुलावं!कुणीही हरवत
अस देखणं रूप तुझं!रूतत जात
नकळत एक आभाळ! दाटत दाटत
आठवांच्या आसवात !भीजत जात ..!

ईश्वरी रूप धारण करता करता
आसमंती अभंगवाणी होते
टाळ चिपळ्यांच्या गजरात
विठ्ठलाच्या दारी तुझी वर्दी लागते ..!

आत्मज्योतीच दर्शन तू घडवतो
प्रारब्ध प्राणाचं लय करतो
या संसाराच निस्सारण करत
अध्यात्माचं गुलाबांत रूपांतर करतो ..!

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =