You are currently viewing राज्याभिषेक आनंद क्षण

राज्याभिषेक आनंद क्षण

*ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*राज्याभिषेक आनंद क्षण*

 

शिवरायांनी अतुल पराक्रम केले

अवघ्या महाराष्ट्राला एकछत्र केले

मावळ्यांच्या साथीने गड किल्ले जिंकले

अंतर्बाह्य शत्रूंना नामोहरम केले

-१-

रयतेचे सार्वभौम राज्य स्थिर केले

रायगडाला राजधानी जाहीर केले

मराठा साम्राज्यास अस्तित्वात आणले

गागाभट्टांनी राज्याभिषेक विधी केले

-२-

सह्याद्री कडेकपारींनी निनाद केले

भगव्या ध्वजास किल्ले आरोहण केले

स्वतंत्र बाणा, स्वाभिमानी राणा एकले

अवघ्यांनी अभिमानाने मुजरे केले

-३-

रयतेने राजांना हृदयी स्थित केले

उत्साहाने,आनंदाने जयघोष केले

सुमुहुर्तास राजे छत्रपती जाहले

देऊनी सलामी तोफांची गर्जन केले

-४-

कर्तबगार अष्टप्रधान मंत्री केले

निष्ठावंत वीरांचे योग्य सत्कार केले

गुण संग्राहक होते राजे शिवराय

आनंद सोहळी उचित सन्मान केले

-५-

 

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

हिमगौरी बिल्डिंग२१ सेक्टर२१ स्कीम१०

यमुनानगर निगडी पुणे-४११०४४

मो. 9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =