सावंतवाडी :
आज सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी फूड फेस्टिवलचे आयोजन केले होते. या फेस्टिवलमध्ये ४० हून अधिक स्टॉल लावण्यात आले होते. त्यात मालवणी खाद्य पदार्थांबरोबरच देशी-विदेशी खाद्यपदार्थही विद्यार्थ्यांनी तयार करून त्याची विक्री केली. या फेस्टिवलचे उद्घाटन संस्थांचे युवराज लखम सावंत-भोसले व युवराज्ञी श्रध्दा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नियमक मंडळाचे सदस्य डॉ. सतीश सावंत, जयप्रकाश सावंत, संचालक प्रा. डी टी देसाई, सहसंचालक ॲड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्रा. डॉ. डी. एल. भारमल, कला व सांस्कृतिक विभागाचे डॉ. डी.जी. बोर्डे, प्रा. डॉ. एस. एम. बुवा, डॉ. बी. एन. हिरामणी, प्रा. एम. ए. ठाकूर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खाद्य महोत्सवामध्ये एकूण 40 स्टॉलधारक विद्यार्थ्यांच्या सहभाग होता. यामध्ये अगदी मालवणी खाद्यपदार्थांपासून विदेशी खाद्यपदार्थापर्यंत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून खाद्य प्रेमींना उपलब्ध करून दिले. पदार्थांमध्ये खास करून घावणे चटणी, खापरोळी रस्सा, अळूवडी, मोदक, बिर्याणीचे विविध प्रकार, फ्रुट सॅलड, पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम, थंडा, नूडल्स, पाणीपुरी, शेवपुरी, भेळपुरी इत्यादी विविध पदार्थ खाद्य महोत्सवामध्ये उपलब्ध केले होते. हा खाद्य महोत्सव विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व उत्साहात पार पडला.