You are currently viewing भिरवंडेतील दिक्षा चव्हाणने कॅरम स्पर्धेत बाजी मारली

भिरवंडेतील दिक्षा चव्हाणने कॅरम स्पर्धेत बाजी मारली

17 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्र राज्य विजेतेपद तर राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व

कणकवली :

भिरवंडे गावासारख्या खेड्यातून येणारी कनेडी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शिकत असलेली दिक्षा नंदकिशोर चव्हाण हिने नुकतेच चिपळूण डेरवण येथील राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

तिची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. पाचवीत असल्यापासून तिने कॅरम खेळातील कौशल्य दाखवायला सुरुवात केली होती. यापूर्वी तिने कॅरम स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय पारितोषिके प्राप्त केली आहेत. तिच्या वडिलांचे सलून दुकान असून तेही एक चांगले फलंदाज आहेत. आपल्या मुली विविध क्षेत्रात विशेषतः खेळात, संगीतक्षेत्रात निपुण व्हाव्यात यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांची दोन नंबर मुलगी दिव्या पाचवीत असून ती संगीत विषयाचे शास्त्रीय शिक्षण घेत आहे.

भिरवंडे सारख्या खेड्यात राहूनही कॅरम, क्रिकेट आणि संगीत यांचे कौशल्य संपादन करत स्वतःसह आपल्या मुलींनाही राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धेत उतरवणाऱ्या नंदकिशोर चव्हाण यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सिंधुदुर्ग नाभिक संघटनेच्या वतीने तिला ‘नाभिक कॅरम कन्या’ म्हणून गौरविण्यात आले आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर आणि त्यांच्या टीमने दिक्षाचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =