You are currently viewing न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे भूमिपूजन संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे भूमिपूजन संपन्न

फोंडाघाट

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे भूमिपूजन मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कालेज फोंडाघाट प्रशालेच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे भूमिपूजन प्रसिद्धजिका दानशूर व्यक्तिमत्व मा.सौ मानसी. दी.माजगावकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री सुभाष सावंत सेक्रेटरी श्री चंद्रशेखर लिंग्रस खजिनदार श्री आनंद मरये फोंडाघाट सरपंच सौ संजना आग्रे.फोंडाघाट एज्यु सोसायटी संचालक श्री संजय आग्रे श्री संदेश पटेल श्री रंजन नेरुळकर श्री बबन पवार श्री राजू पटेल‌ श्री सचिन तायशेटेश्री मनीष गांधी माजी चेअरमन बाळासाहेब डोरले श्री आबू पटेल‌‌ सिने दिग्दर्शक श्री विजू पटेल श्रीसुभाष मरये‌ 12 पाचाचे मानकरी श्री भाई पटेल श्री सुहास लाड श्री संजय सावंत प्रशालेचे माजी विद्यार्थी फोंडाघाटचे ग्रामस्थ‌ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी बोलताना माजगांवकर मॅडम म्हणाल्या शाळा ही विद्यार्थी घडवण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे यासाठी शिक्षकांनी चौकटीच्या बाहेर जाऊन योगदान देणे गरजेचे आहे .आणि ते आमचे शिक्षक करत आहेत म्हणूनच एवढा बदल आपल्याला पहायला मिळतो.माझ्याकडून जे जे सहकार्य करायचे आहे ते मी करेन याहीपूर्वी माजगांवकर मॅडमनी प्रशालेच्या इमारतीलाआर्थिक मदत केली असून त्याचबरोबर सहा वर्ग खोल्या डिजिटल करून देखील दिल्या आहेत संस्था पदाधिकारी यांनी आपल्या मनोगतातून माझगांवकर कुटुंबी यांचे आभार व्यक्त केले.कारण आताच्या काळात शैक्षणिक संस्थेसाठी आर्थिक मदत करणारे माजगांवकर कुटुंबीय आमच्यासाठी लाखमोलाचे आहेत.कार्यक्रम प्रसंगी अनेक माजीविद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी भावना व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − thirteen =