You are currently viewing कुणकेरीत उद्यापासून दशावतार नाट्यस्पर्धा

कुणकेरीत उद्यापासून दशावतार नाट्यस्पर्धा

सावंतवाडी

कुणकेरी क्रीडा आणि कला विकास मंडळाच्या वतीने रविवार १५ जानेवारीपासून जिल्हास्तरीय निमंत्रित दशावतार नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.. सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सात दिवस चालणाऱ्या या दशावतारी नाट्यस्पर्धेची सांगता शनिवार २१ जानेवारीला होणार आहे. या नाट्यस्पर्धेत रविवार १५ जानेवारीला श्री हेळेकर दशावतार नाट्यमंडळ (कारिवडे). भीमकी हरण, सोमवार १६ जानेवारीला अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ (म्हापण) कुर्मदासाची वारी, मंगळवार १७ जानेवारीला खानोलकर दशावतार नाट्य मंडळ (खानोली) अखेरचा कौरव, बुधवार १८ जानेवारीला माऊली दशावतार नाट्यमंडळ (डिंगणे) कृती विकृती, गुरुवार १९ जानेवारीला श्री भावई दशावतार नाट्यमंडळ (कुणकेरी) देवी करनाई महिमा, शुक्रवार २० जानेवारीला चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ (चेंदवण) महारथी कर्ण, शनिवार २१ जानेवारीला वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ (तेंडोली) वृक्षविरहित फळ.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + twenty =