कणकवली
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने हेल्मेट तुमच्यासाठी, सुरक्षा कुटुंबासाठी असे सांगत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत कणकवली हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली कणकवली बस स्थानकावरून सुरू झाली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग नंदकिशोर काळे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
त्यानंतर कणकवली सर्विस रोड वरून तरंदळे फाटा येथून फिरून पुन्हा श्रीधर नाईक चौक नरडवे रोड रेल्वे स्टेशन पासून कणकवली बस स्थानक इथं आली. यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व हेल्मेटस्वारांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देत नंदकुमार काळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कणकवली पोलीस निरीक्षकअनिल जाधव, विनायक चव्हाण, मोटार वाहन निरीक्षण सचिन पोलादे, विजयकुमार अल्लमवार, जाविद शीखलगार, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अरुण पाटील, चैतन्य बकरे,नितीन पाटील, प्रवीण सातारे, अभिजीत शिरगावकर, वाहन चालक संजय केरकर, वरिष्ठ लिपिक खंदारे, तसेच ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी महादेव सावंत, वर्दम बाळू कानडे, तळेकर, काळप, उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग नंदकिशोर काळे यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हेल्मेट परिधान करणे किती गरजेचे आहे, याची माहिती सांगत प्रत्येकाने हेल्मेट घालावे व आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षा करावी करावी, असे आवाहन केले. हेल्मेट सुरक्षा अभियान आपण राबवले आहे. त्यामुळे प्रत्येकाने हेल्मेट वापरावे असे आवाहन केले व सर्वच उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची शपथ घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.