You are currently viewing खासदार  विनायक राऊत  यांच्या माध्यमातून सागर मित्रांचा थकित वेतन प्रश्न निकाली….

खासदार  विनायक राऊत  यांच्या माध्यमातून सागर मित्रांचा थकित वेतन प्रश्न निकाली….

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागर मित्रांचे वेतन गेले आठ महिने प्रलंबित होते. त्यामुळे मत्स्य विभागाच्या सर्व योजना सर्वसामान्य मच्छिमारां पर्यंत पोहोचविणारा सागर मित्र उपाशीपोटी काम करत होते ही बाब  खासदार विनायक राऊत  यांच्या सिंधुदुर्ग कार्यालयात खासदार राऊत यांची सप्टेंबर 2019 मध्ये भेट घेऊन सागर मित्रांनी आपली प्रलंबित वेतनाची अडचण मांडली होती. यावेळी  खासदार राऊत  यांनी तात्काळ सागर मित्रांसमोरच मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त व अव्वर सचिव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून सदरच्या सागर मित्रांच्या प्रलंबित वेतनाबाबत लक्ष वेधून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या.  तसेच तात्काळ मत्स्यव्यवसाय आयुक्त यांना पत्र ही दिले होते.
खासदार विनायक राऊत यांनी  केलेल्या सागर मित्रांच्या प्रलंबित वेतनाच्या बाबत शासनाने तात्काळ निर्णय घेऊन दिनांक 3/12 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागर मित्रांच्या वेतना पोटी रुपये एक कोटी तीन लक्ष ऐंशी हजार एवढे अनुदान मंजूर केले आहे.त्यामुळे सागर मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले असून सागर मित्रांनी खासदार  राऊत यांचे  आभार मानले आहेत. यावेळी मत्स्य सहाय्यक आयुक्त श्री. मालवणकर , माजी जि.प.अध्यक्ष श्री.संग्रामजी प्रभुगावकर, जि.प.सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब, जिल्हा सनियंत्रण समिती सदस्य श्री.सोमा घाडीगांवकर युवासेना तालुका समन्वयक योगेश तावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा