You are currently viewing इचलकरंजीत पठाण चित्रपट प्रदर्शित करु नये !

इचलकरंजीत पठाण चित्रपट प्रदर्शित करु नये !

इचलकरंजीत पठाण चित्रपट प्रदर्शित करु नये !

विश्व हिंदू परिषद – बजरंग दलचे चिञपटगृहांना निवेदनाव्दारे आवाहन

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील सर्व चित्रपटगृहांनी
समस्त हिंदू बांधवांच्या
भावना दुखावणारा पठाण हा चित्रपट
प्रदर्शित करु नये असे आवाहन करणारे निवेदन आज शुक्रवारी विश्व हिंदू परिषद , बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सर्व चिञपटगृहांना सादर करण्यात आले.

जातीय तेढ निर्माण करणारा व समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावणारा पठाण नामक हिंदी चित्रपट येत्या काही दिवसात हिंदुस्थानमध्ये प्रदर्शीत होण्याच्या वाटेवर आहे.तत्पूर्वी या चित्रपटातील गाणी व ट्रेलर दाखवण्यात आला आहे.यामध्ये एक गाणे प्रदर्शीत झाले होते.त्यामध्ये मुद्दाम चित्रपटातील अभिनेत्रीला भगव्या रंगाच्या बिकनीमध्ये दाखवत अश्लील अंग प्रदर्शन करत हिंदूंच्या भावना दुखावत समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यात आला आहे. त्यास विरोध केल्यानंतर दस्तुरखुद्द सेन्सॉर बोर्डाने त्या गाण्याला कात्री लावून योग्य ते बदल सुचवले आहेत.वास्तविक हिंदू धर्मियांच्या तीव्र भावना लक्षात घेता काही दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपट पाठवण्यात आला. पठाण चित्रपटातील गाणे आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन यांनी फिल्ममेकर्सला दिली आहेत. हिंदू विरोधी पठाण चित्रपटात तब्बल २१ ठिकाणी बदल करण्यात आले आहेत.
चित्रपटातील गाणे व ट्रेलरमधूनच हिंदूंच्या भावनांचा अवमान केला जात असेल तर संपूर्ण चित्रपटातुन् किती भावना दुखावल्या गेल्या असतील , याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. त्यातूनच हिंदू समाजातील उद्रेक बाहेर पडून समाजविघातक बाबी घडण्याच्या शक्यता नाकारता येणार नाहीत.त्यामुळेच सदर चित्रपटास अखंड हिंदुस्थानभर मोठा विरोध होत आहेत.हिंदुस्थानातील काही
राज्यांतील चित्रपटगृह मालकांनी स्वतःहून पठाण चित्रपट त्यांच्या चित्रपटगृहात न लावण्याचे घोषित केले आहे.हिंदू धर्मातील संत महंतही हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून आग्रही आहेत.या सर्व बाबी लक्षात घेऊन व हिंदूंच्या भावनांचा आदर करून इचलकरंजी शहरातील सर्व चित्रपटगृहात पठाण चित्रपट प्रदर्शित
करु नये असे आवाहन करणारे निवेदन विश्व हिंदू परिषद , बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज शुक्रवारी फाॅर्च्युन प्लाझा , राधाकृष्ण ,गुरु चिञमंदिर ,पंचवटी ,भाग्यरेखा या
सर्व चिञपटगृह व्यवस्थापनास देण्यात आले.यावेळी निवेदन देताना सुजित कांबळे,सोमेश्वर वाघमोडे,प्रवीण सामंत, बाळासाहेब ओझा,मुकेश चौथे,मुकुंद उरूणकर,अनिल सातपुते, संदीप जाधव,डांगरे मामा, विक्रांत ढवळे,उमाकांत दाभोळे, अरविंद शर्मा,विशाल माळी,म्हाळसाकांत कवडे,अमित पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + two =