You are currently viewing दोडामार्ग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

दोडामार्ग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळेचे यशस्वी आयोजन

दोडामार्ग

विज्ञानाची कास धरून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून प्रयोग केले यासाठी विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, या विज्ञान प्रदर्शनात अनेकांनी सहभाग घेतला त्यात काहींना यश मिळाले तर क्रमांक न मिळाल्याने नाराज न होता पुन्हा प्रयत्न करावे यश निश्चित आहे, यासाठी परिश्रम मेहनत चिकाटीने विज्ञान तंत्रज्ञान यांचा वापर प्रयोगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष जीवनात आपण केला पाहिजे, त्यातून नवीन शोध लागू शकतात.यासाठी शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन विद्यार्थी वर्गाला केल्यास यश संपादन होते असे प्रतिपादन धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुबई संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर यांनी केले. दोडामार्ग तालुक्यातील टोकाला असलेल्या पिकुळे प्रशालेत प्रदर्शनाच्या सुंदर आणि भव्यदिव्य आयोजनाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक स्नेहल गवस व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन यावेळी त्यांनी केले.

दोडामार्ग तालुकास्तरीय ५० व्या विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण आणि समारोपाचा कार्यक्रम ११ जानेवारीला प्रशालेच्या भव्य व्यासपीठावर शिक्षण महर्षी कै. आबासाहेब तोरसकर विज्ञान नगरीत संपन्न झाला. यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून सदाशिव गवस माजी मुख्याध्यापक मडूरा, दोडामार्ग पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नासीर नदाफ, विस्तार अधिकारी दीपा दळवी, केंद्रप्रमुख श्रीम.राजलक्ष्मी लोंढे, सुर्यकांत नाईक, गुरुदास कुबल, आप्पासाहेब हरमलकर, मुख्याध्यापिका स्नेहल गवस प्रा. सोनम सुतार, गटसाधन केंद्राचे कर्मचारी,परीक्षक,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक उपस्थित होते.

या विज्ञान प्रदर्शनात परीक्षक म्हणून काम केले त्यांनी आपली मनोगते सादर केली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विज्ञान प्रतिकृती, अध्यापक निर्मित शै.साहित्य, प्रयोगशाळा परिचर-सहाय्यक प्रतिकृती,निबंध स्पर्धा, वक्तत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ स्वयंसेवक-विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रशालेचे सहा.शिक्षक परेश देसाई यांनी तर मुख्याध्यापिका स्नेहल गवस यांनी आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =