You are currently viewing महाराष्ट्रातील सर्व धर्मीक व प्रार्थना स्थळे तात्काळ खुली करावी; मनसेची मागणी..

महाराष्ट्रातील सर्व धर्मीक व प्रार्थना स्थळे तात्काळ खुली करावी; मनसेची मागणी..

वैभववाडी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने देशातील धार्मिक व प्रार्थना स्थळांवर बंदी घातली होती, सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व धर्मीक व प्रार्थना स्थळे तत्काळ खुली करावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वैभववाडी तहसीलदार यांच्याकडे महाराष्ट्र्र नवनिर्माण सेना वैभववाडी यांच्या वतीने देण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग चा धोका सध्या कमी होत आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन उठविले आहे. देशातील वाईन शॉप, बार, रेस्टॉरंट सुरू केले आहे.
कोरोना संसर्ग कमी व्हावा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर च्या पांडुरंगाला कोरोना नाहीसा व्हावा म्हणून साकडे घातले होते.कोरोना कमी झाला तरी पंढरपूरचे मंदिर बंद आहे. अन्य राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे शासनाच्या नियम व अटी शर्थीवर खुली करण्यांत आली आहेत.याच धर्तीवर राज्य शासनाने प्रार्थना स्थळे खुली करावीत.अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैभववाडी यांच्या वतीने राज्य शासनाकडे केली आहे.

तहसीलदार यांच्या मार्फत राज्य शासनाकडे पोचवावे,अन्यता मनसे पक्षाचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम (जिजी)उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घंटानाद आंदोलन छडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी मनसे वैभववाडी तालुका अध्यक्ष सचिन तावडे, उपतालुका अध्यक्ष दीपक पार्टे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष रुपेश वारंग, शाखा अध्यक्ष दिनकर डफळे, अजय शिंदे ,दीपक मांजलकर, यशवंत डफळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा