You are currently viewing जिल्हा पत्रकार संघ, मुख्यालय पत्रकार समिती व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने हिंदी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाबूराव पराडकर यांना अभिवादन

जिल्हा पत्रकार संघ, मुख्यालय पत्रकार समिती व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने हिंदी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाबूराव पराडकर यांना अभिवादन

सिंधुदुर्गनगरी,

 हिंदी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाबूराव पराडकर यांच्या पराड येथील जन्मगावी त्यांचे स्मारक उभे राहावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले.

         सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ, मुख्यालय पत्रकार समिती आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने येथील पत्रकार कक्षात बाबूराव पराडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकरउपाध्यक्ष बाळ खडपकरमुख्यालय पत्रकार समिती अध्यक्ष संजय वालावलकरसचिव मनोज वारंगमाहिती सहाय्यक रणजित पवाररवी गावडेनंदू आयरेसतीश हरमलकरदत्तप्रसाद वालावलकर आदी उपस्थित होते.

         जिल्हा माहिती अधिकारी श्री.सातपुते म्हणाले, जिल्ह्यात जन्मलेल्या संपादक पराडकर यांनी महाराष्ट्रातून जाऊन हिंदी राज्यात आणि हिंदी पत्रकारितेत ठसा उमटवला.त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १८८३ ला झाला होता तर  १२ जानेवारी १९५५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्यशासनाकडून राज्यस्तरावर हिंदी पत्रकारितेत काम करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देवून गौरवण्यात येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 19 =