नियमांचे करावे लागणार काटेकोर पालन
मुंबई –
करोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून म्हणजेच, 25 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
उद्धव ठाकरे यांनी आज जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले होते, जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी करोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्यात यावे. स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा असे सामुहीक व्यायाम प्रकार एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहतील.
मार्गदर्शक सूचना :
– व्यायामासाठी येणाऱ्या सदस्यांना मार्गदर्शक सूचनांची पूर्णपणे माहिती देणे अपेक्षीत आहे.
– व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे.
– प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी करावी.
– शारिरीक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टी बरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारिरिक अंतर राखणे.
– व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे.
– उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे.
– दररोज रात्री जिम, व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पुर्णपणे निर्जंतुकीकरण करणे.