You are currently viewing राजमाता जिजाऊ

राजमाता जिजाऊ

*अध्यक्ष बुलढाणा जिल्हा दक्षता समिती तथा उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जळगावचे सदस्य लेखक कवी श्री.मनोहर पवार लिखित अप्रतिम पोवाडा*

*राजमाता जिजाऊ*

राजमाता जिजाऊ आमुची
माता सार्थ अभिमान ॥

बुलढाणा जिल्ह्याची शान । मातृतिर्थाचा बहुमान ॥

या मातीत उगवले
एक क्रांतीचे बीज ।
जिजाऊ माता जन्मली
दाही दिशाचे तेज ॥

होती धगधगती ज्वाला
होती स्वाभीमानी तीच l
नव्हती लाचार ती अबला ठेचले तीने सर्प नीच ॥

रणांगणी तळपली ती
निपजला तेजपुंज हिरा ।
गातो कवणे पोवाडे
अभिमान आम्हा शाहिरा ॥

इतिहास घडविला मातेने
पाजले पाणी शिवबाने ।
पताका रानोमाळ भगवी
अटकेपार अभिमानाने ॥

महाराष्ट्रा ला पडले
स्वप्न गोड जिजाऊंचे ।
नाचती शिवभक्त ते
लौकीक सिंदखेड राजाचे ॥

साज चढविला शाहिरांनी
गाण्या मातेची यशोगाथा |
लाखो बहूजन टेकविती
लावू माती पवित्र् माथा ॥

**********************

शाहिर मनोहर पवार
केळवद . चिखली ‘ जि . बुलढाणा .
मो .9850812651.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + fourteen =