You are currently viewing जिथे जिथे नजर जाईल, फक्त तुझा भास आहे

जिथे जिथे नजर जाईल, फक्त तुझा भास आहे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री भारती महाजन रायबागकर यांचा कवयित्री संगीता देवकर यांच्या चार काव्यपंक्तींना आपल्या शब्दांत पुढे नेण्याचा प्रयत्न*

जिथे जिथे नजर जाईल, फक्त तुझा भास आहे
वेड्या माझ्या मनाला, लागला कसला हा ध्यास आहे
पोळलेलं मन अन् शुष्क उन्हाळा जीवनात आहे
गुदमरला जीव इथे, का कोंडला जरासा श्वास आहे

—————————————
*श्रेष्ठ असे कर्तव्य*

लग्न गाठ बांधूनी न उलटला, मास एकही न पुरता
हाक येता कानी तत्क्षणी, निघाला लढण्याकरता
मेंदीरंगले कर सोडवुनी, घेतली बंदूक हाती
ओली हळद विचारी मजशी, काय करावं आता?

अज्ञाताच्या वाटेने गेला ठेवूनी, निशाणी मम उदरात
आसु-हांसुचा संगम माझ्या, दोन्हीही नयनांत
शौर्यगाथा कथूनी तव मी, वाढवील अपुल्या बाळा
वारसा अतुल शौर्याचा देईन,सुखावशील स्वर्गात

फोटोवरचा हार चंदनी, पोळवी तप्त हृदयास
परि नजर प्रेमळ धीर देतसे, शांतवी दग्ध मनास
कर्तव्याला श्रेष्ठ मानणे ही, उज्ज्वल परंपरा वीरांची
ध्यास-भासाविण श्वासाचा, साहवी जीवन प्रवास

@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. आपल्याला ही कविता आवडल्यास लाईक करून नावासह शेअर करायला काही हरकत नाही.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा