*शब्दवेडी साहित्य समूह सदस्या, समाजसेविका तथा लेखिका कवयित्री मीना देवाजी सैंदाणे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अस्तित्व*
आपल्याच गर्भात सुरुंग पेरून,
तू नष्ट करतेयेस तुझ्यातल्या ‘ती’ चं अस्तित्व,
प्रगत युगातही जुन्या बुरसटलेल्या
विचारधारेला चिटकून.
त्याच्या पिढ्यांचं अस्तित्व
पिढीपरात अबाधित राहवे म्हणून
तू स्वतःच खुडून काढतेयेस
निर्मितीच्या बीजाला
कधी कधी इच्छा नसतांना
हळूहळू नामशेष होण्याच्या वाटेवर
तू मार्गस्थ झाली आहेस
कदाचित भविष्यात
पुस्तकात तुझ्यावर
धडा ही शिकवला जाईल
एक होती ती
तुला
अजूनही
संकेत कळला नाही
धोक्याचा इशारा देणाऱ्या घंटेचा
रिती रिवाजाच्या जोखंडात तू
जर तर च्या संभ्रमात भ्रमितच दिसतेस
तुझ्या मनातील हाच कोलाहल
उद्याला तुझी पिढी नष्ट करेल
कदाचित पृथ्वी वरील मानव प्रजाती
कायमची नामशेष झाली असेल..
नामशेष झाली असेल..
नामशेष झाली असेल..
नामशेष झाली असेल…..
*मीना देवाजी सैंदाणे अमळनेर*