You are currently viewing साटेली – भेडशीत प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड काढणेबाबत मार्गदर्शन व जनजागृती शिबीर संपन्न..

साटेली – भेडशीत प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड काढणेबाबत मार्गदर्शन व जनजागृती शिबीर संपन्न..

दोडामार्ग

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड काढणेबाबत मार्गदर्शन व जनजागृती शिबीर चे आयोजन साटेली भेडशी येथे आज दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता ग्राम पंचायत सभागृहात संपन्न झाली.

शिबीर साठी मा.पंकज सिंग शाखा व्यवस्थापक एस. बी. आय, आर, ए गवस शाखा व्यवस्थापक सि. जिल्हा मध्य. सह. बँक साटेली- भेडशी यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. तालुका कृषी अधिकारी दोडामार्ग मा. पि. डी. बनकर यांनी आपल्या प्रास्ताविकात पि.एम किसान अंतर्गत के. सी. सी कार्ड काढणेबाबत शासनाचे ध्येय धोरण, उद्देश व महत्त्व अधोरेखित केले व जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले, मा. शाखा व्यवस्थापक यांनी के. सी. सी कार्ड काढणे बाबत आवश्यक पात्रता, शेतकरी यांचे साठी बँक च्या विविध प्रकारच्या योजना चि माहिती दिली व शेतकरी यांचे शंका निरसन केले, मा. ए. एस कोळी कृषी पर्यवेक्षक यांनी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली, उपसरपंच गणपत डांगी यांनी आपल्या अध्यक्षीय समारोप मध्ये कृषी विभाग करीत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व कृषी विभागाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ शेतकरी यांनी घ्यायला हवा असे आवाहन डांगी यांनी केले. श्री. साईराम शिंदे कृषि सहायक साटेली- भेडशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी श्रीमती. दीप्ती मयेकर मॅडम (माजी सभापती प. स.) मा. नामदेव धरणे (माजी सरपंच) मान. कृष्णा मोरजकर (आत्मा सदस्य) मा. ग्राम पंचायत सदस्य, ग्राम सेविका श्रीम. डोंगरदिवे मॅडम,महिला बचत गट प्रमुख, सचिव, CRP, ग्राम संघ अध्यक्ष, कृषि मित्र सचिन कदम, प्रयोगशील शेतकरी श्री. बाबा बेलेकर, श्री. संजय धरणे, गुणाजी धरणे व मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधू अणि भगिनी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − five =