*वक्रतुंड साहित्य समूहाचे प्रशासक लेखक कवी जगन्नाथ खराटे लिखित अप्रतिम लेख*
*अध्यात्माच्या प्रांगणात…*
४९..
*पाठलाग,नियतीचा…*
जिवनाच्या वाटचालींत कधीकधी अचानक घडलेल्या अशा काही गोष्टी नजरेस पडतात की आपन, दिगमुढ होतो ,आपली विचारशक्तींच खुंटते.अन् ही अत्यंत दुःखद घटना अचानक अशी कशी घडली??.. स्वप्नातंही कल्पना करता येत नाही..असं घडेल असं कधीच वाटणारं नाही ,असं घडुन जातं…
रविवारच्या त्या दिवशी अगदी सकाळी सकाळी मोबाईलची रिंग वाजली,अन् मोबाईल कानाला लावतात ती घटना कानावर पडली.. अक्षरशः सुन्न झालो..मानलेल्या बहीनीचा मुलगा अगदी तडाकफडकी इहलोक सोडून गेला होता..त्या वाईट घटननेने मन बधीर झालं.अन काही क्षण निर्विचार झालो…
अगदी आठ दिवसांपुर्वीच मी तिच्या घरी गेलो होतो.अन् सर्वांचं कुशलमंगल चाललेलं पाहुन आनंद वाटला होता सहा महिन्यांपुर्विच त्यांचं लग्न झालं होतं.अन् नुकतींच कुठं सुखीसंसाराची मांडामांड केली होती त्यानं,..दोन वर्षांपूर्वीच वडिल वारले होते. अन् संसार सावरंत ,तिने मुलांचं लग्न केलं होतं. सर्व अगदी सुरळीतपणे सुरू असताना अचानक हे दुर्दैवाचे भोग तिच्या नशिबी आले. पती गेल्यावर बाईचं जिवन अगदी शुन्य होतं.पन् मुलगा हा तिला आधार असतो .अन नैमकं दैवाने त्या आधारावरंच घाला घातला तर??… ती पार कोसळुन जाते.. एक तर,विधवेपनाच्या दुःखाची छाया असते.. तरीही मोठ्या धिराने ती मुलांना सावरंत असते.दुःख विसरण्याचा प्रयत्न करीत असते..पन् ह्या..दुःखात सुनेच्या वैधव्याचं दुःखाची भर पडली तर तेंच दुःख दुप्पट होते… खरंच हे असं का घडतं?? मानसाच्या आयुष्यात आनंद, समाधान किंबहुना सुख हे तिळातिळाने येतं. पन, दुःख हे मात्रं हे अगदी डोंगरासारखं कोसळतं. ऊधानलेल्या वारयासारखं येत…अन पालापाचोळ्या सारखं ,सारं काही उध्वस्त करुन निघुन जातं.. हे असं का घडतं ?.नियती ही सतत मानसाचा पाठलाग करुन पाठपुरावा करीत असते.अन् अगदी कठोर अशी अग्नीपरिक्षा पाहत असते..पन हे सारं कशासाठी??खरं तर ह्या प्रश्नांची उत्तरे देता येतं अशक्य आहे.. कारण ह्यांच नियतीच्या प्रभावाने प्रभु रामचंद्रांना सुद्धा वनवास भोगावा लागला, खरंतर. “दैव जाणीले कुणी??प्रभु रामचंद्रांचे, राजपुत्र लवांकुश हे दंडकारण्यात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात वाढतात तिथै,”लवांकुशाचा पाळणा पाळण्याची दोरी वाल्मिकी मुनींच्या हाती येते… किती अघटीत आहे हे!!अगदी संसारापासुन विरक्त असलेल्या ऋषी मुनींनासुद्धा,नियती सोडंत नाही…
खरंच दैव, नशिब, किंबहुना नियतीचे डावपेच , किंवा फासे हे कुणालाही कळले नाही. देवादिकांनाही नियतीच्या तावडीतून सुटका होत नाही तर आपण सामान्य मानव आहोत..ती अगदी सावलीसारखी सतत पाठिशी असते…

मानसानं, संसारात राहून सुखाची आशा करनं म्हणजे,सापाच्या सावलीत,अगदी शांतपणे आराम करीत सावलीचा आनंद घेत बसलेल्या ऊंदरासारखा बावळटपणा ठरतो. पाठीमागून नियती ही काळाच्या रुपाने टपुन बसली असते हे बिचार्राच्या ध्यानीमनी नसते….
नियती,नशीब, दैव किंवा विधिलिखित हे सारे एकाच अर्थाचे शब्द.. पन् ह्या नियतीचा जनक कोन आहे?? नियतीचा पिता कोण?असं शोधायला हवं..अन् ते शोधण्यासाठी आपल्याला अंतर्मनात डोकावून पहायलाच हवं.. किंबहुना अध्यात्माच्या माध्यमातून शोध घ्यायला हवा…
भगवत्गितेत सांगितल्याप्रमाणे “कर्मणेवाधिकिरस्ते मा फलेषु कदाचन” मनुष्याने सदैव फलाशारहीत कर्म करीत रहावे.. म्हणजे नियती आपल्याला त्रासदायक ठरणार नाही.. खरंतर,नियतीचे जनक हे कर्म आहे.. कर्मातुनंच नियती जन्माला येते.मग ते कर्म भलबुरं अशा कोणत्याही प्रकारचं असो.नियती म्हणजे कर्मफल किंबहुना कर्माचे फळं हीच नियती,,, अन् कर्म हेंच सृष्टीचं मुळ आहे.सृष्टीत अनेक जिवदेह कर्माचे फळ भोगण्यासाठी जन्माला येतात.अन् तर जीवांच्या ईच्छा किंवा वासना ह्याची पुर्ततः करण्यासाठी कर्माची उत्पत्ती होते.. किंबहुना कर्म घडते..अन् ह्या कर्मातुन नियती घडतं असते… खरं तर हे रहाटगाडगं अगदी सदैव सुरु असते. कर्मातुन नियती अन् नियतीतुन कर्म हे जिवाचा पाठलाग करीत असतात.. आपल्या गतजन्माचे कर्माची परतफेड करण्यासाठी जन्माला यावं लागतं.अन गतजन्मीचे कर्मफल संपल्यावर, तो देह सोडून पुन्हा नव्याने नवा देह धारण करण्यासाठी नवा देह धारण करून जन्माला यावं लागतं..अन् ह्यातुन सुटका मिळवण्यासाठींच श्रीकृष्णांनी निष्काम कर्मयोग सांगितला.”जे काही कर्म करावे ते ईश्वराची इच्छा समजुन ईश्वरालाअर्पण करावे. फलाशाविरहीत कर्म केल्याने नियतीच्या तावडीतून सुटका होईल.साधारणपणे निष्काम कर्म म्हणजे,पाण्याचं नैसर्गिकरित्या वाहनं. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, सर्वजिवसजिवांची तहान भागवुन तृप्त करनं..सर्वांना जिवसंजीवनी बहाल करुन देणं.. कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता हे निष्काम कर्म.. किंबहुना वृक्षवल्लींचं जगासाठी उपयोगी येणं.. फळ,फुल पाणे अन् सावली बहाल करनं.. हे सारं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता सर्वांना भरभरून देणं..
खरंतर,निष्काम कर्मातुन घडलेली नियती, ही ईश्वरचरणी अर्पण केली तर तिचं नियती मोक्षासाठी कारणिभुत ठरते..अन् तिच्या कृपाप्रसादाने जिवन सफल होतं.किंबहुना नियतिचा हांच पाठलाग,हे फार मोठे वरदानरुपी पाठबळ ठरते…
©️जगन्नाथ खराटे ..

.

