You are currently viewing सावंतवाडी विभागात वनराई बंधारे उपक्रम

सावंतवाडी विभागात वनराई बंधारे उपक्रम

सावंतवाडी

वन्यप्राण्यांना वनक्षेत्रात बारमाही पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सावंतवाडी वनविभागाने वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वनविभागाच्या मळगाव परिमंडळातील वनक्षेत्रात विविध ठिकाणी वनराई बंधारे, नैसर्गिक पाणवठे बांधण्यात आले. तर काही ठिकाणी नैसर्गिक पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली.

सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यप्राण्यांना वनक्षेत्रात बारमाही पाणी उपलब्ध व्हावे, हा यामागचा उद्देश आहे. ४ ते ६ जानेवारीदरम्यान मळगाव, ब्राम्हणपाट, कुंभार्ली, नेमळे, चराठा या वनक्षेत्रात ज्या-ज्या ठिकाणी बारमाही पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी श्रमदानातून वनराई बंधारे, नैसर्गिक पाणवठे बांधण्यात आले. या उपक्रमाला संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सदस्य निकिता बुगडे, गजानन सातार्डेकर यांचे सहकार्य मिळाले. या उपक्रमासाठी मळगांव परिमंडळातील वन कर्मचारी प्रमोद राणे, रमेश पाटील, वैशाली वाघमारे, प्रकाश रानगिरे, रामचंद्र रेडकर, गोपाळ सावंत यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 4 =