You are currently viewing भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच’ आयोजित पहिले ‘राष्ट्रीय ऑनलाईन कवी संमेलन’ उत्साहात संपन्न

भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच’ आयोजित पहिले ‘राष्ट्रीय ऑनलाईन कवी संमेलन’ उत्साहात संपन्न

*’भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच’ आयोजित पहिले ‘राष्ट्रीय ऑनलाईन कवी संमेलन’ उत्साहात संपन्न झाले.

गुजरात:

रविवार, दि.८ जानेवारी २०२३ रोजी “भाग्योदय लेखणीचा मंच” समूहाच्या मुख्य प्रशासिका ‘मा.सौ. भाग्यश्री बागड’ (वलसाड) व सह प्रशासक प्रदीप बडदे (नवी मुंबई) यांच्या संकल्पनेतून समूहाचे पहिले ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.

सुरत, गुजरात, सिलवासा, अहमदाबाद, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, अहमदनगर इ. जिल्हातून – राज्यातून साहित्यिकांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहता गुगलमीटच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात नियोजन करण्यात आले होते. ‘मा.सौ. रंजना बोरा’ या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून लाभल्या होत्या. त्यांच्या आजपर्यंतच्या साहित्यिक वाटचालीत दोन कवितासंग्रह बालवांङमय, प्रवासवर्णने असे एकूण साहित्य प्रकाशित झाले आहे. कवी संमेलनादरम्यान उपस्थित सारस्वतांच्या कवितांचे योग्य निरीक्षण, उत्तम परिक्षण आणि मार्गदर्शन त्या अतिशय खुबीने करत होत्या. त्यांचा साहित्यिक क्षेत्रातील अनुभव अलौकिक आणि अतुलनीय आहे तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान असले तरीही कविता हा कवीमनाचा आरसा आहे असे विशेष मत त्यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप बडदे'(कवी/लेखक/पत्रकार) यांनी केले होते. प्रमुख अतिथी म्हणून काव्य निनाद समूहाचे सर्वेसर्वा मा.विकास पालवे यांनी शुभेच्छा देऊन समूहाला अनमोल मार्गदर्शन केले. संमेलनाच्या सुत्रसंचालिका मा.सौ.रिया पवार यांनी अतिशय मनमोहक सुत्रसंचालन केले. त्यांच्या स्वरमय आवाजात संमेलन आनंदाने, उत्साहाने साजरे झाले. अशा बहारदार कार्यक्रमाला दिलीप महाजन, निवृत्ती पाटील, चंद्रकांत तायडे, राजश्री वाणी, अविनाश खरे, आनंद ढाले, आशा नष्टे, सुचित्रा कुंचमवार, प्रांजली काळबेंडे, मुद्रिका शिंदे, संगिता जाधव, विद्या ठवकर, कविता गायकवाड, कविता मालपुरे इ. मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी प्रेम-वात्सल्य, आई, शेतकरी, स्त्रीविशेष, निसर्ग, सामाजिक, वैचारिक अशा विविध विषयांवर कविता सादर करून मनमुराद आनंद लुटला. ऑनलाईन संमेलनात सहभागी सर्व साहित्यिकांना आकर्षक ई-प्रमाणपत्राने देऊन गौरवण्यात येईल असे समूहाच्या संस्थापिका सौ.भाग्यश्री राकेश बागड यांनी सांगितले. काव्यसंमेलन यशस्वी होण्याकरिता प्रशासक व संकलन समितीचे मोलाचे सहकार्य लाभले.

*–प्रदीप बडदे, (नवी मुंबई)*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 15 =