You are currently viewing मराठा क्रांती मोर्चाला चार वर्षे पूर्ण कुडाळ येथे आज कार्यक्रम…

मराठा क्रांती मोर्चाला चार वर्षे पूर्ण कुडाळ येथे आज कार्यक्रम…

कुडाळ

मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्ग च्या क्रांती मोर्च्याला दिनांक 23 ऑक्टोबर 2020 ला चार वर्षे पूर्ण होत आहेत. गेले चार वर्षे आपण आंदोलन किंवा कार्यक्रमाद्वारे हा दिवस साजरा करतो. यावर्षी दिनांक 23 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 3,.30 वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग व मराठा शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मान्यवर व उद्योजक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची तोंड ओळख होण्यासाठी
“शैक्षणिक धोरण 2020 वास्तव आणि अपेक्षा” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला वंदना खरमाळे उपविभागीय अधिकारी कुडाळ, एच एल चौगुले सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ व सुजित डोंगरे आगार व्यवस्थापक कुडाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा