विरोधी नगरसेवक सुशांत नाईक यांच्या मागणीला यश
कणकवली
कणकवली नगरपंचायतीचे विरोधी गटनेते सुशांत नाईक यांच्या मागणीला यश आले असून कणकवली शहरातील केटी बंधाऱ्यांना लोखंडी प्लेट लावून पाणी अडवा, अशी मागणी सुशांत नाईक यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी काही दिवसापूर्वी लघु पाटबंधारे विभागाकडे केली होती.
लघु पाटबंधारे विभागाने केटी बंधाऱ्याला प्लेट टाकून पाणी अडवण्यात आलेलं आहे. नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी प्लेट टाकून अडवल्यामुळे याचा फायदा आता कणकवली शहरातील बिजलीनगर व कणकनगर वासियांना होणार आहे. कणकवली शहरातील जलस्रोतांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे.