You are currently viewing डेगवेत श्री स्थापेश्वर जत्रोत्सव उत्साहात साजरा…

डेगवेत श्री स्थापेश्वर जत्रोत्सव उत्साहात साजरा…

बांदा

डेगवे येथील प्रसिध्द ४८ खेड्यांचे दैवत असलेल्या श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. हजारो भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवीली. या सोहऴ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी श्रींची पुजा अर्चा आदी धार्मिक विधी होऊन देवदर्शन, ओटी भरणे, नवस फेडणे, नवस करणे आदी कार्यक्रमांना सुरुवात झाली.सायंकाळी भजनसेवेचा कार्यक्रम झाला.तसेच रात्री पालखी प्रदक्षिणा सोहळा झाला.

त्यानंतर देवेंद्र नाईक संचलित चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा पातिव्रत्य तेज हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

जत्रोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. यावर्षी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वाहतुक तसेच गर्दीचे व्यवस्थापन बांदा पोलिस तसेच पानवऴ कॉलेजच्या एनसीसी व एनएसएस च्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे केले. श्री देव महालक्ष्मी, स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट, डेगवेच्या वतीने या सोहळ्याचे उत्तम नियोजन कऱण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =