You are currently viewing पेंडूर मांड उत्सवात उद्या भव्य दीपोत्सव

पेंडूर मांड उत्सवात उद्या भव्य दीपोत्सव

मालवण

मालवण तालुक्यातील पेंडुर येथील श्री देव वेताळ मंदिरातील त्रैवार्षिक मांड उत्सव गेले आठ दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असून उद्या दि. ९ जानेवारी रोजी दीपोत्सव साजरा होणार आहे.

पेंडूर गावाचा ऐतिहासिक मांड उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दि. ३० डिसेंबर रोजी श्री देव वेताळाची बहीण श्री देवी जुगाई हिची मिरवणूक काढत या उत्सवास सुरुवात झाली होती. यानिमित्त गेले आठ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या उत्सवात उद्या दि. ९ रोजी दीपोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त प्रसिद्ध रांगोळीकार समीर चांदरकर व त्यांचे सहकारी यांचे रांगोळी प्रदर्शन आयोजित केले असून रात्री ९.३० वा. दीपोत्सव सोहळा व फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. दि. १० रोजी रात्री ८ ते ९.३० या वेळेत न्यू इंग्लिश स्कुल पेंडूर च्या विद्यार्थ्यांची योगासने प्रात्यक्षिके सादर होणार आहेत. तर दि. ११ रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७.३० वा. श्री गणेश माऊली पाताळेश्वर ढोल पथक, चेंदवण यांचे वादन होणार असून रात्री देवीचा गोंधळ होणार आहे. या मांड उत्सवात भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळ व बारापाच मानकरी, पेंडूर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा