You are currently viewing तिच्यासारखे…

तिच्यासारखे…

तिच्यासारखे

नको मज प्रेम आभाळाएवढे,
कणकण मिळू दे भ्रमरासारखे.

शब्द शब्द तुझे टोचती हृदयी,
न राहिले काही बोलण्यासारखे.

स्वच्छंदी मन तिचे तिलाच विचारी,
का फाटले काळीज सागरासारखे.

ती वाट मोकळी जाते तिच्या घरी,
फुल सुगंधीत नाही तिला देण्यासारखे.

विसरू पाहतो मी तिच्या आठवणी,
ती नजरेत राहते आठवल्यासारखे.

जाता जाता ती कानात बोलून गेली,
येईन स्वप्नात तुझ्या भूतकाळासारखे.

प्रतिक्रिया व्यक्त करा