You are currently viewing जांमसंडेत दीर्घायु हेल्थ केअर सेंटर मध्ये १३ जानेवारीला आरोग्य शिबिराचे आयोजन

जांमसंडेत दीर्घायु हेल्थ केअर सेंटर मध्ये १३ जानेवारीला आरोग्य शिबिराचे आयोजन

देवगड

सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी, कर्मचारी संघ सिंधुदुर्ग आयोजित व बी.के. एल. वालावलकर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सावर्डे डेरवण ता. चिपळूण यांच्या सहकार्याने दि.१३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दीर्घायु हेल्थ केअर सेंटर जामसंडे वडांबा भाजप कार्यालय समोर येथे करण्यात आले आहे.

नाव नोंदणी सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. या आरोग्य शिबिरात जनरल मेडिसिन, जनरल सर्जन, स्त्री रोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ व नेत्र रोगतज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करण्यायोग्य रुग्ण आढळल्यास केसरी व पिवळ्या रेशनकार्ड धारकांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया केली जाईल. तरी सदर आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा. शिबिरा संदर्भात अधिक माहितीसाठी विजय कदम ८६ ०० ७२ ३९ ०१, मोहन जामसंडेकर ९४२१२३६८७०, प्रकाश जाधव ८६०५९२८४२६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी, कर्मचारी संघ सिंधुदुर्ग यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा