You are currently viewing महाराष्ट्र शासन कृषी विभाग कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरीय एकदिवशी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र शासन कृषी विभाग कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरीय एकदिवशी प्रशिक्षण संपन्न

वेंगुर्ला :

महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) “आंबा व काजू पीक” सन 2022 – 2023 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन कृषी विभाग अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी जिल्हास्तरीय एक दिवशीय “कीड सर्वेक्षक, पेस्ट मॉनिटर व मास्टर ट्रेनर्स यांचे आंबा व काजू पीक संरक्षण प्रशिक्षण” दिनांक 27. 12. 2022 रोजी हापूस सभागृह, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे संपन्न झाले.

या प्रशिक्षण कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक श्री. एस. डी. दिवेकर, श्री. अजित अडसूळ (उपविभागीय कृषी अधिकारी, सावंतवाडी) श्रीमती. वैशाली मुळ्ये (प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी, कणकवली), प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील कीटक शास्त्रज्ञ व हॉर्टसॅप प्रकल्प अन्वेषक डॉ. विजयकुमार देसाई डॉ. महेंद्र गव्हाणकर, डॉ. अजय मुंज, डॉ. यशवंत गोवेकर व डॉ. गोपाळ गोळवणकर (संशोधन सहयोगी हॉर्टसॅप प्रकल्प), सर्व तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

श्री. एस. डी. दिवेकर यांनी या प्रशिक्षणाचा उद्देश व महत्त्व तसेच पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग आणि कृषी विभागाच्या इतर योजना यांची विस्तृत माहिती आपल्या प्रस्तावनेतून दिली. या कार्यशाळेच्या तांत्रिक क्षेत्रात डॉ. महेंद्र गव्हाणकर उद्यानविद्यावेत्ता यांनी आंबा व काजू पिकाची सद्यस्थितीवर भाष्य केले. डॉक्टर अजय मुंज कीटक शास्त्रज्ञ यांनी आंबा पिकावरील किडींची ओळख व नियंत्रण तर डॉ. यशवंत गोवेकर वनस्पती रोगशास्त्रज्ञ यांनी आंबा व काजू पिकावरील रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. विजयकुमार देसाई यांनी आंबा व काजू पिकावरील रोगाच्या निरीक्षणे घेण्याच्या पद्धती व काजू पालवीवरील किडी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. गोपाळ गोळवणकर यांनी काजू पिकावरील महत्त्वाच्या व दुय्यम किडींची ओळख व नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात आंबा व काजू पिकाच्या प्रक्षेत्र भेटीदरम्यान प्रत्यक्ष कीड रोगाची निरीक्षणे कशा पद्धतीने घ्यावीत हे प्रात्यक्षिक रित्या दाखवण्यात आले.

या प्रशिक्षणात कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना शेतकऱ्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्यावर सखोल चर्चा केली. सदर प्रशिक्षणास प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे 6 शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे एकूण 185 कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विजयकुमार देसाई यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − nine =