You are currently viewing ऐश्वर्य मांजरेकर यांची महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन फेलोशिप साठी निवड

ऐश्वर्य मांजरेकर यांची महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन फेलोशिप साठी निवड

संपूर्ण महाराष्ट्रातून 5 तरुणांची निवड

मालवण

महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन कार्यक्रम युनिसेफ महाराष्ट्र आणि पर्यावरण शिक्षण केंद्र ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन फेलोशिपसाठी मालवणचा ऐश्वर्य मांजरेकर याची निवड करण्यात आली आहे

महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन कार्यक्रम युनिसेफ महाराष्ट्र आणि पर्यावरण शिक्षण केंद्र ,पुणे यांच्यावतीने महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन फेलोशिप हा कार्यक्रम राबविला जातो हा कार्यक्रम हवामानासंबंधी कृती करणे, त्या सादर करणे, आणि विविध धोरण प्रक्रियेमध्ये सहभागी होणे या तीन स्तरांचे प्रशिक्षण प्रदान करतो. या फेलोशिप साठी संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागविले होते. त्या मध्ये ऐश्वर्य ने कचरा व्यवस्थापन मालवण शहर व मालवण समुद्र व नदी किनाऱ्याजवळील पाणथळ जागा या वर प्रबंध सादर केला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून निवडक तरूणांची युनीसेफ महाराष्ट्र व पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे यांच्या तज्ञ टीम मार्फत मुलाखत घेण्यात आली. या मध्ये अंतिम फेरीमध्ये ५ तरुणांची निवड करण्यात आली , या मध्ये सिंधुदुर्ग मालवण मधील ऐश्वर्य मांजरेकर यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा