कणकवली
असलदे गावच्या सरपंचासह नवनियुक्त सदस्यांचा रामेश्वर सोसायटीच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला. यावेळी गावच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन माजी मुख्याध्यापक प्रमोद लोके यांनी केले.
असलदे रामेश्वर विकास सहकारी विकास सेवा सोसायटीच्या वतीने ग्रामपंचायत रामेश्वर सभागृहात सर्व पक्षीय नुतन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि माजी मुख्याध्यापक प्रमोद लोके सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोसायटी चेअरमन भगवान लोके , सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे , उद्योजक सुरेश डामरे, माजी सरपंच लक्ष्मण लोके, संचालक परशुराम परब, शत्रुघ्न डामरे , श्यामराव परब, प्रकाश खरात, अनंत तांबे, कांचन लोके, सुनिता लोके, विठ्ठल खरात , ग्रामस्थ विजय डामरे, संजय डगरे, श्री. दळवी, आत्माराम घाडी , विजय खरात , प्रकाश आचरेकर, दयानंद लोके, उज्वल लोके, ग्रा.प सदस्य विदया आचरेकर, आनंदी खरात, सुवर्णा दळवी, स्वप्ना डामरे, आदी ग्रामपंचायत कर्मचारी मधुसुदन परब, प्रकाश वाळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
असलदे चेअरमन भगवान लोके म्हणाले, ग्रामपंचायत निवडणूकीत निकाल लागल्यानंतर विजयी झालेल्या सरपंच , उपसरपंचांचा सत्कार करण्याचा निर्णय विकास संस्था संचालकांनी घेतला. निवडणूकीमुळे गावात काही मतभेद निर्माण झाले आहेत ते या सत्काराने मिटतील. भविष्यात दोन्ही गटाच्या विजयी झालेल्या उमेदवारांनी गावच्या विकासासाठी चांगला आराखडा बनवून आपली असलेली राजकीय ताकत विकासाला वापरावी. स्पर्धा करावी तर सर्वांनी विकासाशी स्पर्धा करुन गावाच्या उन्नतीसाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
सरपंच चंद्रकांत डामरे म्हणाले , गावचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत आणि विकास सोसायटी या दोन संस्थांनी एकत्रित काम केलं पाहिजे. या सोसायटीच काम योग्य पध्दतीने चालु असून शेतक-यांना न्याय देण्याची भुमिका सातत्याने भगवान लोके व त्यांचे सहकारी पार पाडत आहेत. त्यामुळे भविष्यात काम करत असताना कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता गावचा विकास साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
असलदे रामेश्वर विकास सोसायटीच्या वतीने नवनिर्वाचीत सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब , ग्रा.प सदस्य दयानंद हडकर , विदया आचरेकर, आनंदी खरात, सुवर्णा दळवी, स्वप्ना डामरे व कोळोशी माध्यमिक हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रमोद लोके या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव अजय गोसावी यांनी केले.