You are currently viewing सिंधुदूर्ग एस. टी.बस मधील गैरव्यवहार पोल खोल होणार; जे डी नाडकर्णी

सिंधुदूर्ग एस. टी.बस मधील गैरव्यवहार पोल खोल होणार; जे डी नाडकर्णी

कोविंड च्या काळात जीवावर उदार होऊन बेस्टची सेवा बसवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण लवकरच सगळ्यांसमोर येईल, असा इशारा जे. डी.नाडकर्णी यांनी दिलाआहे.
संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध डेपोमधून मुंबईमध्ये बेस्टची सेवा बजावायला गाड्या मागविल्या गेल्या होत्या, त्यामध्ये सिंधुदुर्ग विभागांमधून सुद्धा अनेक गाड्या पाठवल्या गेल्या होत्या, एवढ्या लांबून गाड्या का मागवल्या गेल्या व त्या मागे काय आहे ते पडताळण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली काही माहित्या मागवले गेल्या आहेत ,पण त्या माहित्या देण्यास एसटी महामंडळ टाळाटाळ करत आहे तसेच काही अधिकाऱ्यांनी जेवणाच्या तसेच राहण्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा आपली पोळी भाजून घेतलेली आहे, आणि सदर सर्व गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना लवकरच पोल-खोल करणार असून सदर अधिकार्‍यांवर महामंडळा च्या नियमाप्रमाणे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यास भाग पडणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 10 =