सावंतवाडी
श्री पंचम खेमराज महाविद्यालय आयोजित राजवाडा सावंतवाडी येथे चालु असलेला दशावतार लोककला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचा ‘कर्ण पिशाच्च एक अर्धसत्य’ व खानोलकर दशावतार मंडळाचा ‘ पालीचा बल्लाळेश्वर ‘ या दोन्ही प्रयोगाना सावंतवाडीतील कला रसिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती.
या नाट्यप्रयोगाला राजसाहेब खेमसावंत भोंसले ,राणीसाहेब शुभदा देवी खेमसावंत भोंसले, युवराज लखम सावंत भोंसले , श्रद्धाराजे भोंसले, उद्योजक अजय दोडीया व सौ .जयश्री दोडीया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी , सावंतवाडी परिसरातील कलारसीक प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.