*काव्य निनाद साहित्य मंच, पुणेच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ कविता वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मी म्हणाले मनाला*
मी म्हणाले मनाला
थोडा विचार कर ना
बदलय जग आता
तू रे थोडा बदल ना
विसरू नको परंपरा
स्वतःची कवाडे उघड
नैराश्याने कधीही
घालू नकोस झापड
मी म्हणाले मनाला
आजुबाजुला बघ ना
कर्तृत्वाचे पंख लावून
नव्या पिढीत रम ना
मी म्हणाले मनाला
आता तरी समज ना
बदल घडतोच असतो
थोडा विचार कर ना
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक