कृषी पर्यवेक्षक विवेकानंद नाईक यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन..

कृषी पर्यवेक्षक विवेकानंद नाईक यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन..

वैभववाडी

मुळगाव मोरगाव तालुका दोडामार्ग येथील व वैभववाडी तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक विवेकानंद अनंत नाईक वय ४९ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले आहे. गुरुवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे वैभववाडी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार करुन त्यांना अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात येत होते. दरम्यान वाटेतच त्यांची प्राणजोत माळवली.
विवेकानंद नाईक १५ वर्षापासून कृषी विभागात कृषी सहाय्यक व त्यानंतर कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांशी त्यांचे मैञीचे संबंध होते. तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ देऊन अनेक तरुणांना शेतीकडे वळविण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन करीत असत. प्रामाणिकपणा, शांत स्वभाव, हसतमुख व्यक्ती म्हणून तालुक्यात ते सर्वञ परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच तालुक्यात सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पत्नी आशालता नाईक या सुध्दा वैभववाडी तालुका कृषी कार्यालयात कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, भाऊ भावजय असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा